आपला जिल्हाताज्या घडामोडी

गावडेवाडी येथे पुणे जिल्हा मल्टी स्किल निदेशक सहविचार सभेचे आयोजन

LokTantraNews24

प्रतिनिधी : 16 ऑगस्ट रोजी हिरकणी विद्यालय गावडेवाडी येथे पुणे जिल्हा मल्टी स्किल निदेशक सहविचार सभा आयोजित करण्यात आली.या सभेसाठी जिल्ह्यातून विविध शाळांतील मल्टी स्किल अभ्यासक्रमाचे 49 निदेशक उपस्थित होते व हिरकणी विद्यालयाचे मुख्याध्यापक बोंबले सर लोकनेते दादा जाधवराव मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक पानसरे सर यांनी निदेशकांना मोलाचे मार्गदर्शन केले.निदेशकांच्या हितासाठी पुणे जिल्हा मल्टी स्किल निदेशक संघटना स्थापन करण्यात आली .संघटनेचे अध्यक्ष विकास कोतवाल ,उपाध्यक्ष गणेश पटेकर ,सचिव नितीन भालेराव ,खजिनदार सुनील काळे ,संघटना सल्लागार चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                           सभेपुढील महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणात मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन (एम एस एफ सी) अभ्यासक्रम चे महत्व अबाधित राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील 40 माध्यमिक शाळेत व्यवसाय अभ्यासक्रम इयत्ता 9वी व 10 वी वर्गासाठी सन 2007 पासून विना अनुदान स्वयं अर्थ सहाय्य तत्वावर राबवित आहेत. सदर शाळातील निदेशक 15 वर्षांपासून अत्यंत अल्प मानधनावर काम करत असून विद्यार्थ्यांना तंत्र-कुशल निर्माते व व्यावसायिक बनवत आहेत. शालेयस्तरावर श्रम प्रतिष्ठा सामाजिक जबाबदारीचे महत्व विद्यार्थी अंगिकारत आहेत. Multi skill asistant technician या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा कल ओळखून पुढील शिक्षणासाठी आवडीचे व्यावसायिक क्षेत्र निवडणे सोपे जाते.                             भविष्यातील कुशल भारतासाठी सर्वच क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करण्याचे सामर्थ्य या अभ्यासक्रमात असून या विषया अंतर्गत विद्यार्थी 1)अभियांत्रिकी, 2)ऊर्जा पर्यावरण,3) शेती पशुपालन,4) गृह आरोग्य इत्यादी विषय स्वतः हाताने काम करत प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय करत आहेत. ही महत्वाची बाब आहे. शासनाने गांभीर्याने या अभ्यासक्रमासाठी प्राधान्याने साह्य करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच गेली 10 /15 वर्षांपासून हा अभ्यासक्रम शासकीय मदती विना चालू ठेवला त्या सर्व अनुभवी पात्र निदेशक यांच्यासाठी सकारात्मक धोरणात्मक निर्णय घ्यावा ही मागणी करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.