ताज्या घडामोडी

बिबट्याच्या वावराने पिंपरी सांडस परिसरात भीतीचे वातावरण

पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची वन विभागाकडे मागणी ; एका पेक्षा अधिक बिबट्या असल्याचे ग्रामस्थांची माहिती

प्रतिनिधी : पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील भरतवाडी, बागवान वस्ती तसेच इतर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या कॅमेऱ्यात कैद देखील झाला आहे. बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली असल्याने दिवसादेखील शेतामध्ये काम करताना देखील भीती वाटत आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.                                   पिंपरी सांडस व परिसरामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याच्या वास्तव्यास पूरक वातावरण असल्याने या परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने अनेकवेळा ग्रामस्थांच्या नजरेस पडला आहे. बिबट्याने शेळी, वासरू, कुत्रे यांचा देखील फडशा पाडलेला आहे. याठिकाणी एकाच नाही तर एक पेक्षा अधिक बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याबाबत वन विभागाला कळवून पिंजरा बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. पिंपरी सांडस व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.                                                                           बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनास्थळांची पाहणी वनविभागाकडून सातत्याने केली जात आहे. बिबट्याच्या वास्तव्यासाठी असणारे पूरक वातावरण याठिकाणी असून मानवी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. वन विभागाचे अधिकारी व तज्ञांनी तयार केलेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर तात्काळ पिंजरा लावण्यात येईल. ज्यांच्या जनावरांची शिकार बिबट्याने केली आहे अशा ४ प्रकरणांची एकूण अंदाजे २५ ते ३० हजार नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही वनविभागाकडून केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.