आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांची मोफत भेट, सामाजिक बांधिलकी जपत माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम..

संपादक: सुखदेव भोरडे

प्रतिनिधीःआचार्य विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पुणे येथील रुद्र प्रकाशनचे प्रकाशक श्री नवनाथ जगताप यांनी शालेय विद्यार्थ्यांना ‘आम्ही घडलो वाचनाने ’ या पुस्तकाच्या सुमारे साडेसातशे प्रती सप्रेम भेट दिल्या.                                                          महाराष्ट्र शासनाच्या दप्तराविना आनंदी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वेगवेगळे उपक्रम विद्यालयामार्फत राबवले जातात.वाचन चळवळ आणि समृद्ध समाजाचा वारसा जपणारे जगतापवाडी (अष्टापूर ) येथील नवनाथ जगताप यांनी प्रकाशित केलेल्या सचिन नामदेव म्हसे संकलित ‘आम्ही घडलो वाचनाने ’ या पुस्तकातील प्रबोधनकार ठाकरे ,डॉ.अब्दुल कलाम ,यशवंतराव चव्हाण, शरद पवार ,अण्णा हजारे, डॉ.श्रीपाल सबनीस ,पी डी पाटील, मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे इत्यादींचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके दररोज वाचावी आणि स्वतःचे जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील जगताप यांनी प्रास्ताविकात केले.                                                     आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नवनाथ जगताप यांनी सांगितले की “भारताच्या सांस्कृतिक परंपरेत वाचन संस्कृती ही भारताने मनापासून जोपासलेली परंपरा आहे परंतु सध्या इलेक्ट्रिक गॅजेट्स मुळे वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे .म्हणून शालेय विद्यार्थ्यांना योग्य वयामध्ये अनेक पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करणे व त्यांना जीवनाप्रती प्रगल्भ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही वाचन चळवळ चालवण्याचा संकल्प पुस्तकविश्व बुक गॅलरी च्या वतीने करीत आहोत.” संस्थेचे सहसचिव श्री शिवाजीराव घोगरे यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये व्यायामाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन श्री श्रीहरी कोतवाल यांनी केले. या पुस्तकातील लता मंगेशकर व अण्णा हजारे यांच्या जीवनचरित्रपर लेखांचे प्रकट वाचन इयत्ता दहावी मधील सिद्धी महाडिक व साहिल गोते या विद्यार्थ्यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे सहसचिव श्री शिवाजी घोगरे तसेच नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल ,ग्रामस्थ काळूराम कोतवाल, रुद्रप्रकाशनचे मालक नवनाथ जगताप आणि विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                               कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जगताप यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब ढवळे व आभार सुहास भुजबळ यांनी मानले.

 

 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.