आपला जिल्हाताज्या घडामोडी

वाडे-बोल्हाई पंचायत समितीगण अध्यक्षपदी अमोल वेताळ यांची निवड

LokTantraNews24

प्रतिनिधी :   १६ ऑगस्ट, २०२३ रोजी हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष कमलेशभाऊ उकरंडे व हवेली पूर्व तालुकाध्यक्ष संजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका कार्याध्यक्ष केतन निकाळजे व उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांच्यावतीने हिंगणगावचे तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल उत्तम वेताळ यांची वंचित बहुजन आघाडी वाडे-बोल्हाई पंचायत समिती गण अध्यक्षपदी निवड करण्यात आली.                                         नियुक्तीपत्र कार्याध्यक्ष केतन निकाळजे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी हिंगणगावचे उपसरपंच सुखदेव कांबळे, माजी उपसरपंच सुभाष गायकवाड, उद्योजक मच्छिंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी कांबळे, पंचशील प्रतिष्ठानचे सचिव सागर निकाळजे, सचिन गायकवाड, गुलाब भिसे, संदीप वेताळ, प्रसाद लभडे, शुभम कांबळे,लोणी-काळभोर ग्रामपंचायत सदस्य नितिन जगताप,अमोल सोनवणे,समाधान अवचट इत्यादी उपस्थित होते.                                                                                    तालुका महासचिव संजय भालेराव, उपाध्यक्ष बाळासाहेब बडेकर, प्रसिद्धी प्रमुख सदाशिव कांबळे, पत्रकार दिगंबर जोगदंड यांनी नवनियुक्त अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन वंचित बहुजन आघाडी पक्ष मजबूत करुन, वंचित घटकांना सोबत घेऊन, सत्ता हातात घेण्यासाठी आपल्या हक्क आणि अधिकाराची संवैधानिक लढाई लढली पाहिजे असे सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.