आपला जिल्हाताज्या घडामोडी

अखेर हिंगणगाव- खामगाव टेक या पुलाचा व भावडी तुळापूर या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा.

LokTantraNews24

प्रतिनिधी:-अनेक वर्षापासून हिंगणगाव खामगाव टेक शिंदेवाडी न्हावी सांडस सांगवी सांडस या ग्रामस्थांची हिंगणगाव व खामगाव टेक या नदीवर ती पुल व्हावा ही मागणी होती यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुद्धा सुरू होता.मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी दोन महिन्यापूर्वी मागणी केली होती.या दोन्ही मागणीसाठी आढळराव पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा व त्याला मान्यता मिळावी अशी आग्रही मांगणी मागणी केली होती.त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री यांनी पी एम आर डी चे आयुक्त यांना या दोन्ही कामाविषयी तातडीने अहवाल द्यावा असे आदेश दिले व या कामासाठी हिंगणगाव खामगाव ते पुलासाठी 25 कोटी रुपये, तुळापूर ते भावडी या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यासंदर्भात काही सूचना देण्यात आल्या,त्यानुसार पीएमआरडीऐ च्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून तसा अहवाल शासन दरबारी दिला.                                                                                           अंतिम स्थळ पाहण्यासाठी बांधकाम आणि रस्ते विभागाचे मुख्य अभियंता श्री भालकर साहेब, कार्यकारी अभियंता कानगावे साहेब, जूनियर इंजिनियर स्वरीफ सिंग शेरागुपे यांच्यासह मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हिंगणगाव या ठिकाणी समक्ष येऊन जागेची पाहणी केली,यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवाजीराव आढळराव पाटील व अधिकार्‍यांचे मोठ्या ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत केले,व सर्व गावांचे वतीने अधिकाऱ्यांचे व शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले.                                         यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आपुल तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी त्याला तत्वतः मान्यता दिली व दोन्ही कामांना 35 कोटीचा फड देण्याचे जाहीर केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले व तालुक्यातील लवकरच विविध अजून काही प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवण्यासाठी जातील लक्ष देणार असल्याचे जाहीर केले, यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता भालकर यांनी कागदपत्रांची पूर्तता करून येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये कामात सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितले.                                                                           यावेळी शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे यांनी शिवाजी दादांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्याचे विकास कामासाठी 36 कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी दिल्याबद्दल दोघांचेही तालुक्याचे वतीने आभार व्यक्त केले,यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अंकुश कोतवाल यांनी बोलताना पंधरा वर्षे पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवल्याबद्दल आढळराव पाटील व मुख्यमंत्री साहेब यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.यावेळी अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना पदाधिकारी व कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.                                                                                               यामध्ये शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, कृती समितीचे अध्यक्ष अंकुश कोतवाल माजी सरपंच कुंडलिक थोरात, सांगवीचे सरपंच विकास तळेकर, संतोष शिवले, टिळेकरवाडी चे सदस्य सुभाष टिळेकर, खामगाव टेक चे सरपंच मारूती थोरात ,मिरवडी चे सरपंच सागर शेलार, शिंदेवाडी चे सरपंच संदिप जगताप, भवरापुर चे सरपंच सचिन सातव उपस्थित होते.आभार माऊली थोरात, निलेश काळभोर, गणेश सातव, शामराव माने यांनी मनोगत व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.