आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

तीस वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा.

LokTantraNews24

 

प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मूळामुठा नदीच्या तीरावर वसलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले हिंगणगाव 1 येथे इयत्ता सातवी, सन १९९२/९३या विद्यार्थ्यांनी “जीवन शिक्षण विद्यामंदिर हिंगणगाव”या शाळेत हजेरी लावली. ज्या शाळेत आपण शिकलो, जेथे आपल्या व्यक्तीमहत्वाचा विकास झाला,शिक्षणाचा पाया पक्का झाला, त्या शाळेचे आपण काही ऋण लागतो ही एकच भावना घेऊन सर्वजण एकत्रित आले.त्यावेळी गुरूवर्य श्री. संजय कुंजीर सरांनी जुने आणि नव्या विचारांचे सांगड घालत मार्गदर्शन केले ऐतिहासिक गाव मुळा मुठा नदीच्या तीरेवर येथे तीस वर्षांनी भरली शालेय विद्यार्थ्यांची शाळा 1992- 93 च्या सातवी च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला लक्ष्मीतरू व शोभेची झाडे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिभा भेट तसेच ग्रंथालय कपाट दिली तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्यावेळी आमची शाळा कशी होती याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले जीवनामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम शालेय जीवनापासून विद्यार्थी करतात त्या आठवणी सांगताना प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुखदुःख आहे हे या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले तसेच जीवन हे अनमोल आहे त्याचा प्रत्येक वेळेस आनंद घ्या तो आनंद म्हणजे आपलं आयुष्य आहे असे मा.सौ. सविता मंगेश भोसेकर कोतवाल ग्रा. पं. सदस्य बोरीऐदी व प्रभाकर जगताप (मा.सरपंच शिंदेवाडी )यांनी यावेळी संदेश दिला व संतोष शिंदे(सरपंच शिंदेवाडी) विजय थोरात अनिल मोरे नाना थोरात सतीश काळे सुरेखा सावंत मनोज कुंभारकर हेमा थोरात नंदा शिंदे संगीता थोरात या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी ताई शिंदे, विजय थोरात, अमित कुंकलोळ यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजू वेताळ यांनी मित्रा विषयी कविता (मित्र असावा गाराव्या सारखा ) अशी भावनिक होऊन कविता सांगून आश्रुना वाट देऊन कवितेतून संदेश दिला व माझी शाळा माझी माती माझी माणसं यावेळी असा एक संदेश देण्यात आला व यावेळी सगळ्यांचे आभार मानण्यात आले व संतोष पिंगळे नंदा शिंदे ( बालाजी नर्सरी) मीना शिंदे निर्मला यादव शशिकला लवांडे विलास कोंडे . अमित कुंकलोळ, संजय टकले राजू वेताळ आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कोतवाल भोसेकर (ग्रामपंचायत सदस्य बोरीऐदी ) यांनी केले हेमा थोरात(आदर्श व्यक्तिमत्व) यांनी आभार व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.