आपला जिल्हाताज्या घडामोडी

नवनियुक्त डी .वाय.एस.पी किरण पोपळघट यांच हवेली पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

LokTantraNews24

प्रतिनिधी :  प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य संलग्न हवेली तालुक्याची मासिक बैठक पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय बापु काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हिंगणगाव येथील एम पी एस सी च्या व्दारे डी वाय एस पी या पोलीस खात्यातील महत्त्वाच्या पदावर किरण पोपळघट सर यांची निवड झाली. म्हणून तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या उज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने डॉ छगन खारतोडे सर यांच्या वतीने H3N2 या इन्फुल्युएन्झा विषाणू बाबतीत घ्यावयाची काळजी या बाबतीत मार्गदर्शन केले. तालुक्याचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे यांची नव्याने दैनिक लोकमतच्या पत्रकारपदी निवड झाली असल्याने उपस्थिती पत्रकार संघातील बांधवाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सभासद बांधव तुळशीराम घुसाळकर, संदिप बोडके, विजय काळभोर, चंद्रकांत दुडे, सचिन सुबे, अमोल आढागळे, भाऊसाहेब महाडिक, श्रीनिवास पाटील, जयदीप जाधव, सचिन माथेफोड, सुनिल सुरळकर, पप्पू चिकणे, विशाल कदम, रियाज शेख, प्रसाद धेडे, शहाजी नगरे आदी उपस्थित होते. विविध विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्वानी सहभाग नोंदवला तसेच पत्रकार संघाच्या दुष्टिने भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रम बाबतीत खुली बातचित झाली. खेळीमेळीच्या वातावरणात मिटिंग पार पडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.