क्राईमताज्या घडामोडी

बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणारा तडीपार इसम गुन्हे शाखा युनिट 6 ने केला जेरबंद

LokTantraNews24

प्रतिनिधी:- पुणे शहरात धारदार शस्त्रे, अग्निशस्त्र बाळगणे व त्याचे साह्याने गून्हे करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याची उपाय योजना म्हणून मा. श्री.पोलिस आयुक्त यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०३/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना बातमी मिळली की, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर मधून दोन वर्षाकरिता तडीपार असणारा इसम नामे ओंकार गुंजाळ हा पुणे शहर हद्दीमध्ये वाघोली येथे आलेला असून त्याचे कडे गावठी बनावटीचे पिस्टल आहे हि माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना कळवून बातमी प्रमाणे जाऊन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने लागलीच पो. उप.निरीक्षक भैरवनाथ शेळके व त्यांचे स्टाफने सापळा रचून एका इसमास पाटील वस्ती, भावडी रोड, वाघोली येथून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओंकार शंकर गुंजाळ वय 25 वर्ष रा- मगरवस्ती, लोणीकंद, तालुका हवेली पुणे असे सांगितले. त्याचे ताब्यात *एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण 30,500 रू किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीर विनापरवाना मिळून आल्याने त्याचेवर लोणीकंद पो. स्टे गु. र. नं. 178 /2023 आर्म ॲक्ट कलम 3(25) म.पो.का.क.37(1)135,142 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचेवर यापूर्वी लोणीकंद, MIDC अहमदनगर या पोलीस स्टेशन मधे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याचे टोळीवर मकोका कायद्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी त्यास तडीपार देखील करण्यात आले होती.                      सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर मा. श्री संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त मा. श्री रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री मा. नारायण शिरगावकर सहा. पोलीस आयुक्त सो गुन्हे २ या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट 6 चे पो. उप.निरीक्षक भैरवनाथ शेळके, पो. हवा. मच्छिंद्र वाळके, पो. ना. विठ्ठल खेडकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.