आपला जिल्हाताज्या घडामोडी

भामा आसखेड संदर्भात इतर हक्कात आसणारे शेरे कमी करू – राहुल कुल

LokTantraNews24

प्रतिनिधी : खेड ,दौंड, हवेली या भागांसाठी भामा आसखेड हे धरण झाले होते . परंतु नंतरच्या काळामध्ये धरणांमधून उजवा आणि डावा असे दोन कालवे तयार होणार होते पण वाढते नागरीकरण लक्षात घेऊन हे पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वळवण्यात आले त्यामुळे एकदरीत पाहता भामा आसखेड मधून शेतीला पाणी देणे शक्य होत नसल्याने हे दोन्ही कालवे रद्द करण्यात आले त्यामुळे भामा आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा काही काळ ठेवण्यात आला होता नंतर संदीप भोंडवे व कृती समितीच्या उपोषणाने हा शेराही काढण्यात आला . परंतु शासनाने या जमीनी फक्त शेती पावरा साठी अज्ञूज्ञेय असा शेरा दाखल केला. त्यामुळे पुन्हा अडचणी तयार झाल्या हा शेरा काढण्यासाठी मंत्री मंडळाने सुद्दा हिरवा कंदील दाखवला आसून या संदर्भात कृती समितीच्या वतीने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या बरोबर चर्चा करून हे शेरे काढ्ण्याचे काम लवकरात लवकर करू आसे त्यांनी सांगितले . त्या वेळी संदीप भोंडवे, श्रीहरी कोतवाल , अंकुश कोतवाल, संभाजी ढमढरे विपुल शितोळे, रंगनाथ बांडे , तान्हाजी चितळकर, काळुराम थोरात , राजेंद्र थोरात , वामन खुळे, राजेंद्र ढमढरे आदी मान्यवर उपस्थित होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.