ताज्या घडामोडी

जेष्ठ समाजशेवक अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराईत केले ५०० झाडांचे वृक्षरोपण. 

LokTantraNews24

प्रतिनिधी:- बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातुन बकोरी डोंगरावर वनराई देवराई प्रकल्प साकारत आहे चंद्रकांत वारघडे यांनी १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने झाडे लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे माध्यमातून वृक्षमित्र धर्मराज बोत्रे यांचे सहकार्याने पि़पळे जगताप याठिकाणी दुसरी देवराई ऊभी राहात आहे आज अखेर १ लक्ष झाडे लावल्याचे वारघडे यांनी सांगितले त्यांचे दादा बाबाजी वारघडे या संस्थेच्या माध्यमातून गेले ४ /५ वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वाघोली येथील ऊद्योजक मनोज कांकरिया यांचे आई प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी २ लाख देशी झाडांचे बियाणे वारकर्यांना वाटप केले जाते व एक झाड वारीचे वाटेवर ही मोहीम राबवली जाते वारकर्यांना झाडांचे महत्व सांगुन झाडे लावणे, पर्यावरण रक्षण, जलसंधारण याबाबत माहिती दिली जाते त्याच प्रमाणे वारघडे यांनी आज अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण करण्यासाठी आलेल्या टोयटा कंपनीच्या कर्मचार्यांना एक आव्हान केले की मी तुम्हाला १० कीलो माती देतो १० पिशव्या देतो आपण प्रतेकाने घरी १० झाडे तयार करुन द्या पुढील वर्षी आपण त्याचे वृक्षरोपण करु कोणत्याही नागरीकाने अशाप्रकारे माघनी केली तर त्यांना हे साहित्य मोफत दिले जाईल असे वारघडे यांनी सांगितले.                                         वृक्षरोपणासाठी चंद्रकांत वारघडे यांचेसहीत, बाळासाहेब वारघडे (राज्य संघटक माहीती सेवा समीती) संदीप डफळ ( सर )वैकफील्ड कंपनीचे एच .आर.योगेश सातव (सर ),तुकाराम डफळ ,वाय.टी.डी.एस.सोसायटीचे चेअरमन अमित बिंगानिया, संदीप कोलते, अंतोश वारघडे,लक्ष्मण गव्हाणे (जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा समिती) कमलेश बहीरट (हवेली तालुका अध्यक्ष माहिती सेवा समिती) अमित साळुंक (उपाध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समीती) अंकुश कोतवाल (जिल्हा उपाध्यक्ष माहिती सेवा समिती) रवी सलगीरे, तसेच टोयटा कंपनीचे कर्मचारी बकोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज त्याठिकाणी ऊंबर, कडु लींब, चिंच, अर्जून, पुत्रजिवा, वड,सिसम,करंंज, भेंडी,फणस,जांभुळ, पिंपळ,कांचन,आपटा या देशी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.