कृषी व व्यापारताज्या घडामोडी

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी सोमवारी मोफत कार्यशाळा

LokTantraNews24

प्रतिनिधी : शहरी आणि ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी देशात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची (पीएमएफएमई) अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेविषया अधिक माहिती व्हावी. व्यावसायिकांच्या शंकाचे निरसन व्हावे. योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया समजावी, यासाठी हवेली तालुका कृषी विभागाच्या वतीने सोमवारी, १३ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी एम. डी. साळे यांनी दिली आहे.                                                        ही कार्यशाळा सकाळी अकरा वाजता शिवाजीनगरमधील कृषी भवनात सुरू होईल. इच्छुकांनी या बाबत एक गुगल फॉर्म भरावयाचा आहे. त्यात आपले नाव, संपर्क क्रमांक, व्यवसायाचे नाव, कोणत्या शेतीमालावर प्रक्रिया करणार आहात या बाबतची माहिती भरावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने कार्यशाळेला उपस्थित राहवे, असे आवाहन साळे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.