अष्टापूर : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.३६ टक्के लागला असून, कु. ईश्वरी आप्पासाहेब जगताप हिने ८९.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला.
विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत यश मिळवले आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत :
१) कु. ईश्वरी आप्पासाहेब जगताप – ८९.६०%
२) कु. अनुष्का महेश गायकवाड – ८६.८०%
३) सोहम घनशाम जगताप – ८६.६०%
४) कु. स्नेहल संदीप ढवळे – ८६.००%
४) कु. मयुरी प्रवीण शितोळे – ८६.००%
५) कु. स्वरांजली विष्णू चोरमले – ८४.५०%
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, संस्थेचे सचिव शांताराम पोमण व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
तसेच न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, संस्था नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, अष्टापूर गावच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल तसेच संस्थेचे शाळा समन्वयक व माजी मुख्याध्यापक सुभाष काळे आणि अष्टापूर गावातील सर्व मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली दळवी, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
