अभिनव मित्र मंडळ संचलित, हिंगणगाव शिंदेवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालयाचा सन २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यालयाच्या यशाला सुवर्ण किनार लाभली आहे.
विद्यालयातून कु. तनया विनोद दरेकर हिने ८५.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. भावेश लालचंद कुवर याने ८२.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. जयश्री कैलास थोरात हिने ७९.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विकास लवांडे तसेच मुख्याध्यापक रवींद्र पानसरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
