अष्टापूर : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे नागपंचमी सणानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी ‘मेहंदी रेखाटन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे आयोजन लहान व मोठ्या अशा दोन गटांत करण्यात आले होते. लहान गटात इयत्ता सहावी ते सातवीतील ४१ विद्यार्थिनींनी, तर मोठ्या गटात इयत्ता नववी ते दहावीतील ५३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेला व कलागुणांना वाव देत विविध आकर्षक मेहंदी रेखाटने साकारली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली दळवी यांनी स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थिनींना नागपंचमी सणाचे महत्त्व व परंपरा याविषयी माहिती दिली. विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आनंददायी व उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचा निकाल
लहान गट (इयत्ता ६ वी ते ७ वी)
- प्रथम क्रमांक : सई महेश जगताप – इयत्ता ७ वी ‘अ’
- द्वितीय क्रमांक : ऐश्वर्या किसन गुंडे – इयत्ता ७ वी ‘अ’
- तृतीय क्रमांक : काव्या दत्तात्रय कोतवाल – इयत्ता ७ वी ‘ब’
- उत्तेजनार्थ : श्रुती योगेश कोतवाल – इयत्ता ६ वी ‘अ’
- उत्तेजनार्थ : श्रुती ज्ञानेश्वर कोतवाल – इयत्ता ६ वी ‘अ’
मोठा गट (इयत्ता ९ वी ते १० वी)
- प्रथम क्रमांक (विभागून) : तनया विनोद पंडित – इयत्ता ९ वी ‘अ’; पल्लवी बापू पाटोळे – इयत्ता १० वी ‘ब’
- द्वितीय क्रमांक (विभागून) : श्रावणी संतोष शितोळे – इयत्ता ९ वी ‘ब’; वैशाली बाळा बिचकुले – इयत्ता ९ वी ‘ब’
- तृतीय क्रमांक (विभागून) : प्रांजल हनुमंत देवकर – इयत्ता १० वी ‘अ’; नम्रता बापूसाहेब कोतवाल – इयत्ता ९ वी ‘अ’
- उत्तेजनार्थ : श्रावणी योगेश कोतवाल – इयत्ता ९ वी ‘अ’
स्पर्धेतील सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे तसेच सहशिक्षक नवनाथ भागवत, सविता शितोळे, अनिल कुंजीर, कल्पना तांबे, सुषमा दरेकर, हरिश्चंद्र खेडेकर, सुहास भुजबळ, अमर वारे, दीपिका गायकवाड, प्रियांका कोतवाल, छाया कांबळे, गुणवंत कोतवाल, राजू कोतवाल, रामदास कोतवाल आणि छगन खेडेकर यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
