अष्टापूर, प्रतिनिधी: आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी प्रास्ताविक करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाचा, विकासाभिमुख कार्यपद्धतीचा तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “त्यांची कार्यनिष्ठा, निर्णयक्षमता आणि धाडसी नेतृत्व समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांच्यासह नवनाथ भागवत, चौरंगनाथ कामथे, सुशीला सातपुते, सुषमा दरेकर, सविता शितोळे, अनिल कुंजीर, कल्पना तांबे, हरिश्चंद्र खेडेकर, सुहास भुजबळ, अमर वारे, छाया कांबळे, दीपिका गायकवाड, प्रियांका कोतवाल तसेच शिक्षकेतर कर्मचारी गुणवंत कोतवाल, राजू कोतवाल, रामदास कोतवाल, नाना खेडेकर आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शेवटी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चौरंगनाथ कामथे यांनी केले.
