अष्टापूर (प्रतिनिधी):अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुभाष बाबुराव काळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या आवारात ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या ज्ञानदानाची वृत्ती कधीही थांबता कामा नये. उर्वरित आयुष्यही शिक्षक म्हणूनच समाजासाठी कार्यरत राहून शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय कोलते यांनी सुभाष काळे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टापूर परिसरातील शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उंच शिखरे गाठली आहेत.
या प्रसंगी श्रीहरी कोतवाल, नंदकुमार सागर, नितीन मेमाणे, माजी मुख्याध्यापक रामदास जगताप, सचिन कोतवाल, ऐश्वर्या मांगडे तसेच विद्यार्थिनी श्रावणी निकाळजे यांनी काळे सरांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सुभाष काळे यांनी संस्था, पदाधिकारी, सहकारी शिक्षक, कुटुंबीय, पालक आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास गीतांजली काळे, सत्यभामा काळे, नवनीत काळे, मनोज काळे, उद्योजक राजेश कोतवाल, नितीन मेमाणे, विजय कोतवाल, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, रमेशबापू कोतवाल, सरपंच पुष्पाताई कोतवाल, पोपटराव भोसले, सुभाषअण्णा कोतवाल, रामचंद्र खेडेकर, सयाजीअण्णा ताकवणे, सुभाष बोत्रे, पोपटभाई ताकवणे, नामदेवआप्पा काळे, प्रवीण मांगडे, जिजाबा महाडिक, चांदभाई मणियार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चौरंगनाथ कामथे यांनी केले.
