बंधन संस्थेकडून निराधार महिलांना आधार सामाजिक संस्था बंधन संस्था ही निराधार महिलांना आधार देत असून या संस्थेकडून समाजातील गरजू व निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या संस्थेकडून मदत केली जाते ही संस्था गेली 2006 पासून काम करीत असून पुणे विभागामध्ये दहा शाखा काम करीत असून पिंपरी सांडस हद्दीतील अष्टापुर फाटा या ठिकाणी बंधन संस्थेकडून महिलांना शिलाई मशीन उपयुक्त कपडे किराणा या वस्तूचे वाटप करण्यात आले असून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले. या ठिकाणी राहू येथील 40 महिलांना साहित्य देण्यात आले तर आष्टापूर फाटा या ठिकाणी सुद्धा काही महिलांना साहित्य देण्यात आले.आत्तापर्यंत दोन हजार महिलांना साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती बजाज कंपनीचे मॅनेजर सैफाली बजाज यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे शुभम मित्तल, पूजा कांबळे ,अर्जीत दुत्ता ,भास्कर मुथया ,संजयदास उपस्थित होते.
ताज्या घडामोडी
- वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीतर्फे “किल्ले बनवा” स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
- महावितरणकडून शेतीपंपासाठी लाईट कनेक्शन बंद – शेतकऱ्यांची पुन्हा सुरू करण्याची मागणी
- न्यू इंग्लिश स्कूल,अष्टापुर येथे सुखदेव भोरडे यांचा सत्कार
- MPSC राज्यसेवेत सोनुल कोतवाल यांचे दिव्यांग प्रवर्गातून राज्यात पहिले स्थान; वर्ग-१ अधिकारी पदी निवड
- फक्त १० मिनिटांत गॅस बर्नर स्वच्छ करा; छिद्रे उघडा आणि ज्वाला करा तेजस्वी!
- तुळशी विवाह २०२५: महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त
- पिंपरी सांडस विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सुखदेव भोरडे, तर व्हाईस चेअरमन पदी अरविंद नलगे यांची बिनविरोध निवड
- लक्ष्मीपूजन 2025: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
Saturday, November 15
