अष्टापूर, दि. १२ सप्टेंबर : येथील न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ‘श्री गणेशमूर्ती बनविणे स्पर्धा व प्रदर्शन २०२६’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आकर्षक, सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आपल्या कलागुणांचे व कल्पकतेचे दर्शन घडविले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत विविध कलात्मक मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींचे शालेय प्रदर्शनात विशेष कौतुक करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांची गटनिहाय नावे पुढीलप्रमाणे :
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी – मुले)
- प्रथम क्रमांक (विभागून): आदित्य गजानन घुले (६ वी ‘ब’) व रुद्रांश शिवप्रसाद कंकरवाल (६ वी ‘अ’)
- द्वितीय क्रमांक (विभागून): तेजस गुंडाराम साळवे (७ वी ‘ब’) व जय अमोल जगताप (७ वी ‘अ’)
- तृतीय क्रमांक (विभागून): शिवराज गणेश भोरडे व साईराज गणेश भोरडे (५ वी ‘अ’)
- उत्तेजनार्थ: आदित्य सचिन कांबळे (७ वी ‘अ’)
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी – मुली)
- प्रथम क्रमांक: कु. श्रुती नंदकुमार आडागळे (७ वी ‘ब’)
- द्वितीय क्रमांक (विभागून): कु. वैष्णवी नितीन गावडे व कु. शिवन्या सुभाष कोतवाल (५ वी ‘अ’)
- तृतीय क्रमांक: कु. आरोही रणजित कोळपे (६ वी ‘अ’)
- उत्तेजनार्थ: कु. शर्वरी नानासो कोतवाल (५ वी ‘अ’) व कु. स्वरा भरत शिंदे (७ वी ‘अ’)
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी)
- प्रथम क्रमांक: कु. लावण्या सागर सोनवणे (८ वी ‘ब’)
- द्वितीय क्रमांक: कु. तेजल गुंडाराम साळवे
- तृतीय क्रमांक: कु. ममता राजाराम तडवळे
- उत्तेजनार्थ: कु. तेजस्विनी नंदकुमार आडागळे व शौर्य दीपक कोतवाल
स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहशिक्षक अनिल कुंजीर व हरिश्चंद्र खेडेकर यांनी काम पाहिले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका दिपाली दळवी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थांनी विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
