वाडेबोल्हाई : श्री संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जोगेश्वरी माता इंग्लिश मीडियम स्कूल आणि अनुसया तुकाराम पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि भावनिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर श्री क्षेत्र वाडे बोल्हाई येथील निवृत्त मेजर भाऊसाहेब लांडगे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या वंदे मातरम्, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर केले. श्रीमती पठारे मॅडम यांनी व्यसनमुक्तीची, तर क्रीडा शिक्षक सूर्यकांत दाजी क्षीरसागर यांनी साक्षरतेची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, स्वागतगीत, भाषणे, लेझीम, कवायत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयाच्या शिक्षिका पल्लवी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले आकर्षक, दिमाखदार आणि हृदयस्पर्शी लेझीम हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तालबद्ध लेझीम सादरीकरणातून भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, शौर्य आणि सामाजिक मूल्यांचे प्रभावी दर्शन घडले.
या सादरीकरणातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी कै. पंढरीनाथ उर्फ आण्णासाहेब पठारे यांच्या स्मृतींना भावपूर्ण उजाळा देण्यात आला. आण्णासाहेबांचे कार्य, त्याग आणि संस्थेच्या उभारणीत असलेले योगदान यांचा भावनिक पट सादरीकरणातून उपस्थितांसमोर उभा राहिला. या हृदयस्पर्शी सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कै. आण्णासाहेबांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाडे बोल्हाईचे माजी उपसरपंच विद्याधर बापू गावडे होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंढरीनाथ (आण्णासाहेब) पठारे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच पल्लवीताई प्रदीप शिंदे, माजी सरपंच वैशालीताई केसवड, श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या संचालिका लताताई गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे, संस्थेचे सहसचिव रवींद्रदादा बापूसाहेब पठारे, संचालक प्रकाश पठारे, विद्यमान उपसरपंच राणीताई नानासाहेब पायगुडे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष निळकंठ केसवड तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रदीपशेठ शिंदे, योगेशशेठ गायकवाड, नानासाहेब पायगुडे, सोनालीताई रिकामे, मोनालीताई भोर, छायाताई पायगुडे, प्रकाशशेठ इंगळे, चंद्रकांतजी केसवड, तुकारामजी शिंदे, अमोल पायगुडे, नंदूशेठ भोर, संतोष चव्हाण, संदीप चव्हाण, संकेत भोर, कपिल यशवंत शिंदे, हिंमत जाधव, गणेश गायकवाड, संतोष पायगुडे, महादू मामा गायकवाड, गणेश दादा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जोगेश्वरी माता विद्यालयाचे प्राचार्य धुमाळ, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उमा काळे आणि इंग्लिश मीडियमच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर इयत्ता दहावी तसेच बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सरपंच पल्लवीताई प्रदीप शिंदे यांनी इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्याची घोषणा केली. पुढील वर्षीही प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
उत्कृष्ट सेवेसाठी सोलापूर शिक्षक सेनेतर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयातील सेवक राजेंद्र ढगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हवेली तालुका क्रीडा संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल क्रीडा शिक्षक सूर्यकांत दाजी क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला.
बाल विज्ञान मेळाव्यात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणारा इयत्ता नववी ‘ब’चा विद्यार्थी स्वराज महेश गायकवाड तसेच त्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विज्ञान शिक्षक राजेंद्र राऊत यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घडवत यशवंतराव शिंदे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यालयातील होतकरू विद्यार्थिनी प्रिया बांगर (इयत्ता नववी ‘अ’) हिला सायकल भेट दिली. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त चंद्रकांतजी केसवड यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सहकार्यवाह रवींद्रदादा पठारे यांनी विद्यार्थी जीवनातील शिस्त, अभ्यास आणि क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात विद्याधर बापू गावडे यांनी विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब पठारे, सचिव दत्तात्रय काळे आणि उपाध्यक्ष महेंद्र पठारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मेंगडे, किरण गायकवाड, राजेंद्र राऊत, राजू कोल्हे, राजेंद्र गायकवाड, सविता इंगळे, कोमल गायकवाड, दिव्या पाटील, भोर मॅडम, पोमण सर, शिवराज पवार, अमर गायकवाड, वाघमारे सर, शिवाजी शिंदे, राजेंद्र ढगे, विशाल रंधवे, दीपक भडलकर, मंगेश बोराटे, कांबळे मॅडम, महानंदा शिंदे, भुजबळ मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास दर्शन चौधरी, पांडुरंग लांडे, ओमेश्वरी भारसाकळे, शोभा होळकर, कोतवाल मॅडम, हरगुडे मॅडम, प्रा. इथापे, उनउणे मॅडम, गुरव मॅडम, रेखा काळे तसेच अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश फलके आणि रुपाली नवले यांनी केले, तर पल्लवी गायकवाड यांनी आभार मानले.
देशभक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि संस्थेबद्दलची कृतज्ञता यांचा सुंदर संगम घडविणारा हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
