अष्टापूर, ता. १५ : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर (ता. हवेली) येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, सरपंच पुष्पाताई कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, स्कूल कमिटी सदस्य तयाजी जगताप, विजय कोतवाल, नितीन मेमाणे, माजी सरपंच दत्तात्रय कटके, शामराव वारे, सुरेश कोतवाल, सुभाष कोतवाल, अतुल कोतवाल, शिवाजी कोतवाल, उद्योगपती पोपट कोतवाल, संजय कोतवाल, मुख्याध्यापिका दिपाली दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले. शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख सुरेश ओंबळे, चौरंगनाथ कामथे, अनिल कुंजीर तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचेही उत्कृष्ट सादरीकरण केले.
मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विजय कोतवाल आणि नितीन मेमाणे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्त व क्रांतिकारकांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, अभंगवाणी आणि भाषणे सादर केली. ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयातही यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना माजी सरपंच कै. अण्णासाहेब कोतवाल यांच्या स्मरणार्थ सचिन व विकास कोतवाल यांच्यातर्फे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच रामदास जगताप, अतुल कोतवाल, मनोज गोते आणि अमोल जवळकर यांच्या वतीनेही गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
इयत्ता पहिली ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह एनएमएमएस (NMMS) आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा नितीन मेमाणे यांच्या सौजन्याने मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर सहशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी आभार मानले.
यावेळी प्रकाश मेमाणे, किरण कोतवाल, सचिन कोतवाल, दीपक कोतवाल, रमेश कोतवाल, नितीन कोतवाल, महेश ढवळे, मनोज कोतवाल, दादा रणसिंग, आकाश पाटेकर, स्वप्निल पाटोळे, अमित कोतवाल, संदीप कोतवाल, भरत शिंदे, मरीअप्पा नाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
