अष्टापूर : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आनंदी बाजाराचे आयोजन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य तसेच गावातील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या आनंदी बाजारामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलवर भाज्या, फळे तसेच विविध घरगुती पदार्थांची विक्री केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नाणी व नोटांची ओळख, खरेदी-विक्रीचे व्यवहार, बेरीज-वजाबाकीच्या गणिती क्रिया तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विक्री करताना ग्राहकांशी संवाद साधला व आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना सहकार्य केले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढीस लागली. स्थानिक उत्पादनांची ओळख करून देणे आणि श्रमाचे महत्त्व समजावून देण्यावर या उपक्रमामध्ये विशेष भर देण्यात आला.
अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नेतृत्वगुण तसेच संवादकौशल्यांचा विकास होत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले.

या कार्यक्रमास आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, अष्टापूरच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल, स्कूल कमिटी सदस्य नितीन मेमाणे, तयाजी जगताप, विजय कोतवाल, दिवाकर पिंगळे, अष्टापूर गावचे पोलीस पाटील कैलास कोतवाल यांच्यासह संतोष कोतवाल, अमोल कोतवाल, दीपक कोतवाल, महेश कोतवाल, राहुल कोतवाल, रमेश आबासो कोतवाल, दिनेश कोतवाल, ॲड. मनोज कोतवाल, केतन निकाळजे तसेच अष्टापूर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले, सूत्रसंचालन सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल कुंजीर यांनी मानले.
