८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलकवाडी येथे शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान मिळाले. शाळेसाठी एचपी कंपनीचा दर्जेदार प्रिंटर प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री तुषार कराळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच, विविध विकास कार्यकारी सोसायटी पिंपरी सांडस चे माजी चेअरमन माननीय श्री राजेंद्र रामदास बोडके यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे श्री सिद्धिविनायक क्रिटीकॅअर हॉस्पिटल, उरुळी कांचन यांच्याकडून शाळेला दोन सायकली भेट मिळाल्या. या सायकली शाळेतील विद्यार्थिनी कु. साहिल हरिभाऊ श्रीराम आणि कु. शौर्य देवेंद्र कामठे यांना प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमासाठी पिंपरी सांडस ग्रामपंचायतीचे कार्यकुशल माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य माननीय श्री मंगेश भाऊ गवारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाळेच्या वतीने श्रीमती अश्विनी आव्हाळे मॅडम यांनी दोन्ही मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षक श्री साहेबराव लोणारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.