मराठी मनोरंजनविश्वात सध्या एका गोड आणि आनंददायी बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे, सोहमची होणारी पत्नी म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारी!
पूजा बिरारी हिनं ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत तिची “मंजिरी” ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तीच्या साधेपणा आणि प्रभावी अभिनयामुळे ती मराठी घराघरात ओळखली जाऊ लागली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोहम आणि पूजामधील नातं आता लग्नाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या दोघांचा विवाह लवकरच होणार असून, दोन्ही कुटुंबीयांकडून तयारी सुरू झाली आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर या दोघांच्या जोडीच्या फोटोसह शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अनेक मराठी कलाकार, चाहते आणि चाहते मंडळी या दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.