वाडेबोल्हाई: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत वाडेबोल्हाई यांच्या विद्यमाने लहान मुलांसाठी “किल्ले बनवा” ही नाविन्यपूर्ण स्पर्धा दिनांक १९ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उत्साहात राबविण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडेगाव येथे सरपंच वैशाली केसवड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले
या स्पर्धेत वाडेबोल्हाई गावातील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुलांचा मोबाईल वापर कमी व्हावा, त्यांना गड-किल्ल्यांचा इतिहास आणि भौगोलिक रचना समजावी तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमामध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर सक्तीचा ठेवण्यात आला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्वही समजले.
तयार करण्यात आलेल्या किल्ल्यांचे परीक्षण शिक्षक गोविंद केंद्र, शिवराज पवार आणि दर्शन चौधरी यांनी केले. या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
बक्षीस वितरणावेळी प्रथम क्रमांक कु. ऋषी शेळके, द्वितीय क्रमांक कु. सूरज धुमाळ, आणि तृतीय क्रमांक कु. साई केसवड यांनी पटकावला. विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख पारितोषिके देण्यात आली —
- प्रथम क्रमांक: ₹३०००/- (संदीप गावडे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांच्यावतीने)
- द्वितीय क्रमांक: ₹२०००/- (सुमित शिंदे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांच्यावतीने)
- तृतीय क्रमांक: ₹१०००/- (मोनाली नवनाथ भोर (गावडे), माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांच्यावतीने)
तसेच एकूण ९ उत्तेजनार्थ बक्षीसे सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच स्वाती इंगळे, आणि सदस्य सोनाली शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी ₹५००/- प्रमाणे देण्यात आली.
या कार्यक्रमास सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच स्वाती इंगळे, सदस्य सोनाली शिंदे, मोनाली भोर (गावडे), नंदकुमार भोर, गणेश भोरडे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष भोसले, पोलीस पाटील सुषमा चौधरी, शिक्षकवृंद गोविंद केंद्र, शिवराज पवार, जयवंत मोहिते, ज्ञानेश्वर गायकवाड, एकनाथ वारघडे, संदिप बगडे, किरण धुमाळ, लक्ष्मण भोर, वैशाली भोर, वैशाली लवांडे, प्रियांका इंगळे व गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे गावात असा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम प्रथमच राबविण्यात आला.
