नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (YCMOU) नियोजन अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ अशी आहे.
या भरती अंतर्गत एक रिक्त पद जाहीर करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ७८,८०० रुपये ते २,०९,२०० रुपये इतका वेतनमान लागू होणार आहे.
अर्जासाठी पात्रता अशी आहे की, उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असावी तसेच सरकारी, उपसरकारी किंवा उद्योग क्षेत्रातील गट-अ दर्जाच्या पदावर किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून, विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची मुद्रित प्रत खालील पत्त्यावर पाठवावी:
कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, नाशिक – ४२२२२२.
उमेदवारांची निवड मुलाखत किंवा चाचणी यांच्या आधारे केली जाणार आहे. हे पद प्रतिनियुक्तीवर (Deputation) भरण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.