पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकविले.
17 वर्षे वयोगटातील मुलींचा संघ प्रथम क्रमांकावर राहिला तर 14 वर्षे वयोगटातील मुलींचा संघ द्वितीय क्रमांकावर राहिला.
या संघाचे व्यवस्थापन पल्लवी गायकवाड मॅडम यांनी केले. शालेय क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर, तसेच सहशिक्षक पठारे मॅडम, नवले मॅडम, इंगळे मॅडम, कोमल गायकवाड मॅडम आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच जोगेश्वरीच्या विद्यार्थिनींनी 2.30 मिनिटांत 20 खेळाडू बाद करून तालुकास्तरीय विजेत्याचा मान आपल्याकडे आणल्याचे दाखवून दिले. प्रत्येक फेरीत विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
17 वर्षे वयोगटातील खेळाडू:
सृष्टी गडदे, पूनम बांगर, ज्ञानेश्वरी गडदे, सेजल गावडे, समृद्धी गडदे, सेजल थिटे, संस्कृती नागवडे, प्रीती सोनकांबळे, वैष्णवी चौरे, प्रांजल गायकवाड, साक्षी जाधव, प्रज्ञा गाडगे, अस्मि शिंदे, समृद्धी पवार, प्रज्वली खेकडे, अनुष्का शिंगटे.
14 वर्षे वयोगटातील खेळाडू:
अनुष्का गायकवाड, अनुष्का गव्हाणे, सिद्धी गडदे, धनश्री बांगर, अमिता शिंदे, सोनाली चौरे, समीक्षा शिंदे, शुभ्रा शिंदे, स्वरा गायकवाड, कार्तिकी गायकवाड, श्रेया भोकरे, खुशी माळी, प्रिया जाधव, आर्या गायकवाड, उमा जाधव, सुचित्रा गायकवाड.
या संघाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड मिळवली असून, प्रचंड मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर हा विजय संपादन केला आहे. जोगेश्वरी विद्यालयाने 2019 पासून प्रथम क्रमांकाची परंपरा कायम ठेवली आहे.
स्पर्धेतील विजयाबद्दल श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ पठारे, अण्णासाहेब पठारे संस्थेचे सचिव आमदार बापूसाहेब पठारे, एडवोकेट काळे सर, संचालक वैभव पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे, विद्याधर गावडे, डोंगरगावच्या माजी सरपंच व संचालिका लताताई गायकवाड, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतीश धुमाळ सर यांनी संघाचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.