भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार असलेले राधाकृष्णन यांनी विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.
या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. एकूण ९८.३ टक्के मतदान झाले होते.
या मतदानादरम्यान, काही पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली होती. भारत राष्ट्र समिती (BRS) आणि बिजू जनता दल (BJD) यांनी निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, शिरोमणी अकाली दलाचे (वारीस पंजाब दे) खासदार सरबजीत सिंग खालसा आणि अमृतपाल सिंग यांनीही निवडणुकीतून माघार घेतली होती.