डिजिटल व्यवहार अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी ‘फोनपे’ने नवीन फिचर सुरू केले आहे – UPI सर्कल. यामधून आता बँक खाते नसलेल्या व्यक्तीलाही UPI च्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे.
UPI सर्कल हे फीचर खास करून अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत, परंतु त्यांना ऑनलाइन पेमेंट करायचं आहे – जसे की वृद्ध नागरिक, विद्यार्थी, किंवा घरगुती मदतनीस.
UPI सर्कल कसं काम करतं?
- एक प्रायमरी युजर (बँक खातेधारक) सर्कल तयार करतो आणि त्यामध्ये सेकंडरी युजर्स (ज्यांचं स्वतःचं खाते नाही) जोडतो.
- सेकंडरी युजर एखादं पेमेंट करण्याची विनंती करतो.
- प्रायमरी युजर ही विनंती स्वीकारल्यावर, त्याच्या खात्यातून संबंधित पेमेंट केलं जातं.
महत्वाचे नियम व मर्यादा:
- एका दिवसात कमाल ₹15,000 पर्यंत व्यवहार करता येतो.
- एकावेळी एका व्यवहाराची मर्यादा ₹5,000 आहे.
- एक प्रायमरी युजर पाच सेकंडरी युजर्सपर्यंत सर्कलमध्ये सामील करू शकतो.
- मात्र, प्रत्येक सेकंडरी युजर फक्त एका प्रायमरी युजरशी लिंक होऊ शकतो.
या सुविधेचा उद्देश काय?
UPI सर्कलचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे डिजिटल व्यवहार सर्वांपर्यंत पोहोचवणे — विशेषतः अशा व्यक्तींना ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा बँक खाते नसले तरी डिजिटल व्यवहार करावयाचे आहेत.
घरातील सदस्य, वृद्ध, कामगार, किंवा विश्वासू कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करताना आता अडचण येणार नाही.