संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) काही देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणात बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तन, सीरिया, यमन, इराक, अल्जीरिया, लिबिया आणि ट्युनिसिया या देशांचा समावेश आहे. यूएई सरकारने या देशांच्या नागरिकांसाठी वर्क, टुरिस्ट, आणि इतर कोणत्याही प्रकारचे व्हिसा दिले जाणार नाहीत.
या निर्णयाचे कारण सुरक्षा आणि अवैध आप्रवासनाचे मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे. यूएईमध्ये वाढती सुरक्षा आव्हाने आणि काही देशांमधून अवैध आप्रवासी येण्याची समस्या लक्षात घेत, हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या धोरणामुळे यादीतील देशांच्या नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश मिळवणे अधिक कठीण होईल.
तथापि, या व्हिसा बंदीच्या निर्णयामुळे यूएईतील आर्थिक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रावर काय परिणाम होईल, यावर चर्चा सुरू आहे.