प्रतिनिधी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला दुप्पट टॅरिफ (कर) आता त्यांच्याच देशासाठी अडचणीचा ठरत आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारत आता अमेरिकेकडून सर्वाधिक टॅरिफ लावल्या गेलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, आता हे धोरण अमेरिकेतील सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठीच डोकेदुखी ठरत आहे.
अमेरिकेलाच महागाईचा फटका
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी इतर देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकन कंपन्या आणि ग्राहक आधीपासूनच त्रस्त आहेत. त्यात आता भारतीय वस्तूंवरही 50% टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत महागाई प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, या टॅरिफ धोरणांमुळे केवळ महागाईच नाही, तर अमेरिकेतील रोजगारावरही मोठा परिणाम होऊ शकतो.
भारत अमेरिकेला प्रामुख्याने औषधे, स्मार्टफोनचे सुटे भाग आणि कपड्यांची निर्यात करतो. गेल्या दहा वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार दुपटीने वाढला आहे. 2023 मध्ये भारताने अमेरिकेकडून $87 अब्ज रुपयांची आयात केली होती, तर अमेरिकेला $47 अब्ज रुपयांची निर्यात केली होती. ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे, ज्या अमेरिकन कंपन्यांनी चीनमधून आपले प्रकल्प भारतात हलवले होते, त्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतावर टॅरिफ लावताच अमेरिकेवरच आले नवे संकट; डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढले
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला दुप्पट टॅरिफ (कर) आता त्यांच्याच देशासाठी अडचणीचा ठरत आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारत आता अमेरिकेकडून सर्वाधिक टॅरिफ लावल्या गेलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, आता हे धोरण अमेरिकेतील सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठीच डोकेदुखी ठरत आहे.