मनपा शाळा अनाजीवस्ती शाळेचे माजी विद्यार्थी आणि भा. ज. पा. युवा मोर्चा पुणे शहराचे सरचिटणीस तसेच भा. ज. पा. हडपसर आणि मांजरी गावचे मा. उपसरपंच सुमित अप्पा घुले यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत अनाजीवस्ती शाळेचे दोन विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले. जान्हवी तानाजी सोनटक्के यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर अजिंक्य राजेश कदम यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे टॅब आणि सायकल बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले, जे सुमित अप्पा घुले यांच्या वतीने करण्यात आले. मागील शैक्षणिक वर्षात देखील सुमित अप्पा घुले यांनी विद्यार्थ्यांना सुमारे एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य दिले होते. ही परंपरा कायम ठेवत याही वर्षी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि भरघोस बक्षिसे देण्यात आली.

सुमित अप्पा घुले यांनी शाळेला कोणतीही भौतिक सुविधा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सातव सर यांनी केले, आणि अनाजीवस्ती शाळा गावाच्या प्रतिष्ठेत भर घालेल असे सांगितले.
कार्यक्रमाला बाळासाहेब घुले (शासनियुक्त नगरसेवक), गणेश घुले, सोहेल मणेर, भाऊसाहेब घुले, प्रशांत घावटे, अक्षय वाडेकर, ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली आवटे आणि शिक्षिका रसिका गोडसे उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्रद्धा मोहबे यांनी केले.
