अष्टापुर:आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापुर येथे प्रख्यात पत्रकार सुखदेव भोरडे यांचा शाळेच्या वतीने मान्यवर उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
पिंपरी सांडस विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी भोरडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल कुंजीर यांनी मानले.
या वेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुखदेव भोरडे हे सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांवर नेहमीच सक्रिय असून त्यांच्या ‘लोकतंत्र न्यूज टाइम्स’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील विविध घडामोडींवर सखोल बातम्या प्रकाशित केल्या जातात.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालय परिवारातर्फे सुखदेव भोरडे यांना भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
