प्रतिनिधी: काही वर्षांपूर्वी नामिबियामध्ये एक दुर्मिळ घटना घडली, ज्यामुळे ४७६ वर्षांपूर्वीच्या एका जहाजातील खजिन्याचे रहस्य उघड झाले. खोदकाम करताना कामगारांना सोन्याची नाणी आणि इतर मौल्यवान वस्तू सापडल्या, ज्याचा संबंध थेट भारताशी आहे.
भारताच्या दिशेने निघालेले जहाज बेपत्ता
ही घटना १६ व्या शतकातील आहे, जेव्हा पोर्तुगालचा समुद्री व्यापार शिखरावर होता. त्यावेळी ‘बोम जेसस’ नावाचे एक पोर्तुगाली जहाज 1533 साली लिस्बनहून भारताकडे निघाले होते, पण वाटेत ते बेपत्ता झाले. अनेक वर्षे हे जहाज कुठे गेले, हे कोणालाच माहीत नव्हते.
२००८ साली नामिबियाच्या वाळवंटी प्रदेशात हिऱ्यांसाठी खोदकाम सुरू असताना हे जहाज सापडले. डॉ. डिएटर नोलि यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननात अनेक मौल्यवान गोष्टी समोर आल्या.
खजिन्यात काय सापडले?
जेव्हा हे जहाज सापडले, तेव्हा आतमध्ये मोठा खजिना दडलेला होता.
- २००० सोन्याची नाणी: या जहाजात सुमारे २००० शुद्ध सोन्याची नाणी सापडली.
- लाखो रुपयांच्या तांब्याच्या विटा: याशिवाय लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या विटाही मिळाल्या, ज्यावर जर्मनीच्या ‘फ्यूगर-थुर्झो’ (Fugger-Thurzo) कंपनीचा लोगो होता.
- इतर वस्तू: सोन्या-तांब्याव्यतिरिक्त भाले, कांस्य भांडी, बंदुका, तलवारी आणि हस्तिदंत यांसारख्या वस्तूही सापडल्या.
हा सर्व खजिना शेकडो वर्षांनंतरही सुरक्षित अवस्थेत होता. हे जहाज एका मोठ्या वादळात उलटले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाळवंटात असल्यामुळे हे अवशेष लुटेऱ्यांपासून सुरक्षित राहिले. या शोधामुळे १६ व्या शतकातील पोर्तुगाली व्यापार, सागरी मार्ग आणि इतिहासाची अनेक महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.