26 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लकवाडी येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रॉनी सलढाणा तर अध्यक्ष इंजिनीयर रॉजर सलढाना हे होते . पिंपरी सांडस ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश गवारे मा चेरमन सतिष भोरडे ,पत्रकार सुखदेव भोरडे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनील मोडक, गणपत गायकवाड ,अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक अर्जुन कोतवाल शाळेच्या मुख्याधापक अश्विनी कुटे . पल्लवी लोणारी . नूतन तोडकरआदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थी मनोगते ,बक्षिस वितरण, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक कोतवाल यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी पाच हजार रुपये देणगी दिली. तसेच ॲडवोकेट रॉनी सलढाणा यांनी पाच हजार रुपये देणगी दिली. अध्यक्षांनी भाषणामधून शाळेच्या विकासा बद्दल कौतुक व्यक्त केले.पालक,ग्रामस्थ यांकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमचे सूत्र संचालन व अभार प्रदर्शन साहेबराव लोणारी यानी केले.
ताज्या घडामोडी
- न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जुन्या नाण्यांचे आकर्षक प्रदर्शन
- न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
- मनपा शाळा आणि अनाजीवस्तीचा बदलतोय चेहरा; विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समितीची सभा उत्साहात
- वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीतर्फे “किल्ले बनवा” स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
- महावितरणकडून शेतीपंपासाठी लाईट कनेक्शन बंद – शेतकऱ्यांची पुन्हा सुरू करण्याची मागणी
- न्यू इंग्लिश स्कूल,अष्टापुर येथे सुखदेव भोरडे यांचा सत्कार
- MPSC राज्यसेवेत सोनुल कोतवाल यांचे दिव्यांग प्रवर्गातून राज्यात पहिले स्थान; वर्ग-१ अधिकारी पदी निवड
- फक्त १० मिनिटांत गॅस बर्नर स्वच्छ करा; छिद्रे उघडा आणि ज्वाला करा तेजस्वी!
Sunday, December 7
