शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या हवेली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा २०२५-२६ मध्ये आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये शाळेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत क्रमांक पटकावले.
- १५०० मीटर धावण्यात कु. प्रतिक्षा विकास भंडलकर हिने प्रथम क्रमांक, तर चैताली पोपट कोतवाल हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
- ४०० मीटर (मुले) – शुभम नवनाथ गायकवाड याने द्वितीय क्रमांक, तसेच ३००० मीटर स्पर्धेतही त्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
- २०० मीटर धावण्यात आदर्श रघुनाथ देवकर याला तृतीय क्रमांक मिळाला.
- ४०० मीटर (मुली) – शरण्या आबू माकर हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
- ४×१०० मीटर रिले शर्यतीत शुभम गायकवाड, विराज देवकर, समर्थ माकर, प्रथमेश भंडलकर या चौकडीने तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सुरेश ओंबळे, अनिल कुंजीर व राजू कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर विद्यालयाचे नाव उज्वल झाले आहे. याबद्दल आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, यशवंत साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सुभाष जगताप, नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, शाळा समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुभाष काळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.