अष्टापूर, (प्रतिनिधी) –“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा गोडवा, प्रेम, संस्कार आणि आपुलकी जपत अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठीतील थोर साहित्यिक, कवी, नाटककार, समीक्षक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यकृतींमधून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर (ता. हवेली) येथे मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व विविध साहित्यिकांच्या पुस्तक पूजनाने शिक्षकांच्या हस्ते करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी, वेशभूषा, गीतगायन तसेच समूह नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहशिक्षिका सविता शितोळे, सुशीला सातपुते, सुषमा दरेकर, कल्पना तांबे, छाया कांबळे, दीपिका गायकवाड, तेजस्विनी कोतवाल व प्रियंका कोतवाल यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
चित्रकला स्पर्धेत लहान गटातून इयत्ता पाचवीमध्ये वैभव पोपट थोरात याने प्रथम, संस्कृती सागर सागर हिने द्वितीय, तर प्राजक्ता रवींद्र शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता सहावीमध्ये सई महेश जगताप प्रथम, अनुष्का संतोष धुमाळ द्वितीय आणि श्रावणी पोपट कोतवाल तृतीय ठरली. इयत्ता सातवीमध्ये शंभूराजे सयाजी पिलाने प्रथम, स्वरा संदीप मेमाणे द्वितीय आणि वेदिका संदीप कोतवाल तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
मोठ्या गटातील चित्रकला स्पर्धेत इयत्ता आठवीमध्ये हर्षदा मदन साठे हिने प्रथम, नम्रता बापूसाहेब कोतवाल हिने द्वितीय, तर जान्हवी रणजित शिंदे व वैभव अशोक मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. इयत्ता नववीमध्ये स्वराली आनंद कोतवाल हिने प्रथम, सांची साबळे हिने द्वितीय आणि श्रावस्ती साबळे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
वेशभूषा स्पर्धेत आर्या मगर हिने प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या गुंडे हिने द्वितीय, श्रेया कोतवाल हिने तृतीय, तर ज्ञानेश्वरी भगत, आदिती सोनवणे, मानसी उकरंडे आणि तेजस साळवे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.
रांगोळी स्पर्धेत श्रावणी शितोळे हिने प्रथम, तेजस साळवे याने द्वितीय आणि छाया आगलावे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
वक्तृत्व स्पर्धेच्या लहान गटात आराध्या अण्णा कोतवाल हिने प्रथम, शरण्या चंद्रकांत माकर हिने द्वितीय आणि आर्या पोपट कोतवाल हिने तृतीय क्रमांक मिळविला. शर्वणी सोनवणे व गणेश बालाजी भांगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
मोठ्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी संतोष शितोळे हिने प्रथम, रिद्धी कोतवाल हिने द्वितीय आणि श्रावणी सावंत हिने तृतीय क्रमांक मिळविला. नंदिनी साकत व हर्षदा कसुरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
निबंध स्पर्धा
“मायबोली मराठी भाषा” व “मराठी भाषेचे महत्त्व” या विषयांवर लहान व मोठ्या गटात स्पर्धा घेण्यात आली.
मराठी नृत्य सादरीकरण
इयत्ता ६ वी, ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धांचे परीक्षण अनिल कुंजीर, हरिचंद्र खेडेकर, अमर वारे, सुशीला सातपुते, कल्पना तांबे, छाया कांबळे, दीपिका गायकवाड, सविता शितोळे, प्रियंका कोतवाल व राजेश्वरी कोतवाल यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा दरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता शितोळे यांनी केले.
मराठी भाषेचा गौरव आणि साहित्यिक वारसा जपण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
