श्री संत तुकाराम शिक्षण संस्था चंदननगर संचालित,अनुसया तुकाराम पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, वाडेबोल्हाई येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.. गुरुवार, दि. 4 सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सतीश धूमाळ सर होते. प्रमुख पाहुणे इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक दिलीप शिंदे व प्रा. राजेंद्र राऊत व प्रा. गणेश फलके सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून सर्व प्राध्यापकांचा झाड व पुस्तक व पेन देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “जीवन घडवण्यात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे” याबाबत आपले अनुभव मांडले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री बर्वे पूजा गायकवाड साक्षी शितोळे तनुजा हरगुडे पायल जाधव यांनी भाषणातून प्राध्यपकान विषयी आदर व्यक्त केला
फलके सरांनी मनोगतात विद्यार्थ्यांच्या घडणीत गुरूंच्या मार्गदर्शनाचे व वाचनाचे महत्व अधोरेखित केले. शिंदे सर व राऊत सर यांनीही शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले व महाविद्यालयांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले.वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर उमा काळे यांनी आपल्या भाषणात उज्वल भविष्य घडवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आवश्यक असल्याचे सांगितले No या शब्दाचा अर्थ नाही असा नसून Next Opportunity असा घ्यावा असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. धूमाळ यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार आणि गुरूंचे मार्गदर्शन आत्मसात करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सदरं वाडे बोल्हाई या ठिकाणी सीनियर कॉलेजचे पहिलेच वर्ष असून अप्रतिम प्रतिसाद विद्यार्थी प्रवेशास मिळाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ आण्णा पठारे, संस्थेचे कार्यवाह आमदार बापूसाहेब पठारे व सहकार्य अड दत्तात्रय काळे व सर्व संचालक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सदर महाविद्यालय सुरू आहे.सदर कार्यक्रम प्रा मळेकर, प्रा चित्ते, प्रा राठोड,प्रा ऊनउणे मॅडम,वायकर, प्रा इथापे, प्रा गायकवाड मॅडम, राजेंद्र ढगे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.कायेक्रमाचे प्रास्ताविक प्रा गायकवाड, व सूत्रसंचालन पूजा गायकवाड व के चव्हाण या विद्यार्थिनींनी केले. तर आभार व्यक्त करून कायेक्रमांची सांगता झाली अशी माहिती डॉ काळे मॅडम यांनी दिली