26 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लकवाडी येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रॉनी सलढाणा तर अध्यक्ष इंजिनीयर रॉजर सलढाना हे होते . पिंपरी सांडस ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश गवारे मा चेरमन सतिष भोरडे ,पत्रकार सुखदेव भोरडे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनील मोडक, गणपत गायकवाड ,अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक अर्जुन कोतवाल शाळेच्या मुख्याधापक अश्विनी कुटे . पल्लवी लोणारी . नूतन तोडकरआदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थी मनोगते ,बक्षिस वितरण, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अष्टापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक कोतवाल यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी पाच हजार रुपये देणगी दिली. तसेच ॲडवोकेट रॉनी सलढाणा यांनी पाच हजार रुपये देणगी दिली. अध्यक्षांनी भाषणामधून शाळेच्या विकासा बद्दल कौतुक व्यक्त केले.पालक,ग्रामस्थ यांकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमचे सूत्र संचालन व अभार प्रदर्शन साहेबराव लोणारी यानी केले.
ताज्या घडामोडी
- कलकवाडी शाळेला प्रिंटर व सायकलचे अनमोल योगदान
- तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जोगेश्वरी माता विद्यालयाने पटकविले विजेतेपद
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे महापूर मदत पॅकेज जाहीर
- 5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनची बॅटरी का लवकर संपते? जाणून घ्या कारणे
- कफ सिरप प्रकरणात ११ बालकांचा मृत्यूचा संशय; केंद्र सरकारचे पालकांना आणि राज्यांना महत्त्वाचे निर्देश
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नियोजन अधिकारी पदासाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर
- न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुरमध्ये शिक्षक सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
- उद्या आहे दसरा, पण ‘आज’ संध्याकाळपासूनच सुरू होतेय विजयादशमीची तिथी; शुभ मुहूर्त लगेच तपासा.
Friday, October 17