अष्टापूर :आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे आज दुर्मीळ व ऐतिहासिक नाण्यांचे प्रभावी प्रदर्शन भरविण्यात आले. शिवकालीन तसेच विविध संस्थानकालीन नाण्यांसह जगभरातील शंभर देशांची नाणी आणि नोटा विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी सांगितले की, या प्रदर्शनाला विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतिहासाचा अभ्यास आणि प्राचीन चलनव्यवस्थेची ओळख विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनात शिवकालीन, संस्थानकालीन तसेच विविध साम्राज्यांच्या दुर्मीळ नाण्यांचा विशेष समावेश होता. शिवछत्रपतींच्या दुर्मीळ चलनांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या संग्रहामागे असल्याचे नाणेसंग्राहक विशाल जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हे अनोखे प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले.
