प्रतिनिधी: पिंपरी सांडस (ता. हवेली) विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुखदेव भोरडे तर व्हाईस चेअरमनपदी अरविंद नलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजेंद्र गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.
या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून पुणे येथील सहायक उपनिबंधक संतोष तळपे यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव संजय चव्हाण हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संचालक सोमनाथ भोरडे, सतीश भोरडे, संजय मांडे, बाळासाहेब श्रीराम, दिलीप हरगुडे, रंजना भोरडे, जालिंदर दोडके, राजेंद्र बोडके, राजेंद्र गावडे, विकास भोरडे, शंकर भोरडे यांच्यासह माजी सरपंच बाळासाहेब भोरडे, शंकरराव मांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान भोरडे, रामभाऊ शिंगटे, संदीप भोरडे, सुलोचना भोरडे, गोरख भोरडे, धनंजय भोरडे, विकास भोरडे, भानुदास भोर, बजरंग चितळकर, रामदास भोरडे, महेंद्र भोरडे, दत्तात्रय गजरे, संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
