लग्नाच्या वेळी मिळणाऱ्या भेटवस्तूंवर आयकर लागतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत आयकर विभागाने स्पष्ट नियम ठरवले आहेत. आयकर कायदा कलम 56(2)(x) नुसार, लग्नाच्या प्रसंगी मिळालेल्या काही भेटवस्तूंवर कर लागू होत नाही, तर काही भेटींवर कर लागतो.
✅ करमुक्त भेटवस्तू कोणत्या?
- जर आई, वडील, भाऊ, बहिण, मामा, मावशी, चुलत भाऊ-बहिण अशा जवळच्या नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्या, तर त्या करमुक्त असतात.
- या भेटींमध्ये रोख रक्कम, दागिने, मालमत्ता यांचाही समावेश असू शकतो.
⚠️ कोणत्या भेटींवर लागतो कर?
- जर एखाद्या अपरिचित व्यक्तीकडून किंवा नातेवाईक नसलेल्या व्यक्तीकडून लग्नाच्या वेळी रु. ५०,००० पेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू मिळाल्या, तर त्यावर कर लागतो.
- अशा भेटींची नोंद ‘इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस’ (इतर स्रोतांमधून उत्पन्न) या प्रकारात करून त्यावर कर भरावा लागतो.
🚫 हुंडा कायद्याने गुन्हा!
- लग्नात हुंडा घेणे किंवा देणे भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा आहे.
- हुंडा दिला किंवा घेतल्यास, संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
- त्यामुळे वडिलांनी मुलीला दिलेला प्लॉट, दागिने इत्यादी जर “हुंडा” म्हणून देण्यात आले, तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे