स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये एक प्रश्न नेहमी पडतो – 5G वापरल्यावर फोनची बॅटरी इतकी लवकर का संपते? तज्ञांच्या मते यामागे अनेक कारणे आहेत.
सर्वप्रथम, 5G नेटवर्क 4G पेक्षा जास्त उर्जा वापरते. त्यामुळे फोनमधील बॅटरीवर जास्त ताण येतो. विशेषतः 2020–2021 दरम्यानचे काही 5G चिपसेट्स पूर्णपणे ऑप्टिमाईज नसल्याने ते जास्त ऊर्जा घेतात. यामुळे फोन गरम होतो आणि बॅटरीची कार्यक्षमता कमी होते.
तसेच, ज्या भागात 5G कव्हरेज कमी आहे, तिथे फोन सतत 4G आणि 5G दरम्यान स्विच करत राहतो. या प्रक्रियेत बॅटरी जास्त खर्ची पडते.
सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन हेही महत्त्वाचे कारण आहे. जर फोनचे सॉफ्टवेअर योग्यप्रकारे ट्यून केलेले नसेल, तर 5G मोडेम आणि हार्डवेअर घटक सतत जास्त उर्जा वापरतात. काही कंपन्यांनी बॅटरी बचतीसाठी खास 5G मॉडेम डिझाईन केले आहेत.
याशिवाय, 5G स्मार्टफोनवर UHD किंवा उच्च रिझोल्यूशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मोठा डिस्प्ले आणि उच्च रिफ्रेश रेट यामुळेही बॅटरी लवकर खर्च होते.
म्हणूनच, 5G चा वापर करताना बॅटरी अधिक वेगाने कमी होणे ही सामान्य बाब मानली जाते. भविष्यातील सुधारित चिपसेट्स आणि ऑप्टिमायझेशनमुळे ही समस्या काही प्रमाणात सोडवली जाऊ शकते.